अकलूदच्या तरुणाचा चाकूहल्ला करून खून : नागपूरातून आवळल्या संतोष गुप्ताच्या मुसक्या


Aklud youth stabbed to death : Santosh Gupta smiles from Nagpur भुसावळ :  तापी नदीजवळील बंद टाेलनाक्याजवळ शुभम सपकाळे या तरूणाचा  खून झाला होता. या प्रकरणी पसार असलेल्या संताेष गुप्ता  (40)  याला पाेलिसांनी नागपूर रेल्वे  स्थानकावरून अटक केली आहे. आरोपीला सोमवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर आरोपीचा दुसरा  साथीदार याचा कसून शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
खून केल्यानंतर संशयित पसार 
तापी नदीजवळील टाेल नाक्याजवळ शुभम सपकाळे याचा खून झाला हाेता. या प्रकरणातील गुप्ता पिता, पुत्र पसार झाले असून त्यांचा शाेध घेतला जात होता. यातील संताेष गुप्ता हा नागपूर येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून फैजपूर पाेलिसांनी अधीक्षकांच्या मार्फत नागपूर पाेलिस प्रशासनाला याची माहिती दिली, नागपूर पाेलिसांनी रविवारी सकाळी गुप्ता याला रेल्वे स्थानकावर ताब्यात घेत फैजपूर पाेलिसांना याची माहिती दिली. याप्रकरणी फैजपूर पाेलिसांचे पथक नागपूर येथे गेल्यानंतर गुप्ता याला ताब्यात घेण्यात आले. सोमवारी आरोपीला फैजपूर येथे आणल्यानंतर अटक करण्यात आली व भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. डीवायएसपी डाॅ. कुणाल साेनवणे, सहायक निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर अधिक तपास करीत आहेत.

मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !