जळगावातील चार वर्षीय बालकाने केला रोजा


यावल : मुस्लिम समाजातील सर्वात पवित्र महिना रमजानला सुरूवात झाली आहे. या महिन्यात रोजा (उपवास) ठेवणे हे प्रत्येक मुस्लिम बांधवांचे कर्तव्य असून जळगाव येथील जिदान खान मुजाहिद खान (4) या लहान मुलाने रमजानचा उपवास (रोजा) ठेवला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

त्याचे वडील हे खाजगी नोकरीत आहेत व आई फिरदोस खान या गृहिणी आहेत. उपवास (रोजे) हे एकूण 13 तासांचे आहेत. उपवास ठेवल्याने आजोबा मेहबूब खान, आजी फरजाना खान, मोठे बाबा मोहसीन खान, मजहर खान, काका आवेज खान भुसावळ नगरपालिका कार्यालय अधीक्षक शेख परवेज अहमद आदींनी त्याचे कौतुक केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !