वराडसीम ग्रामपंचायतीच्या दप्तराची चाेरी, गुन्हा दाखल


भुसावळ : तालुक्यातील वराडसीम येथील ग्राम पंचायतीच्या असलेल्या दप्तराची चाेरी कपाटातून चाेरट्याने केल्याची घटना २० ते २३ जानेवारी २०२३ या काळात घडली. याप्रकरणी येथील तालुका पाेलिस ठाण्यात शनिवारी (दि. २५) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दाखल झाला. तब्बल दाेन महिन्यानंतर दाखल झालेल्या गुन्हामुळे वराडसीम गावात हा चर्चेचा विषय ठरला अाहे.

तालुक्यातील वराडसीम येथील ग्राम पंचायतीच्या कार्यालयात कपाटात ठेवलेले रजिष्टर, दप्तर असे सुमारे ५ हजार ७०० रूपये कींमतीचे हे रजिष्टर काेणी तरी चाेरट्यांने दि. २० ते २३ जानेवारी या काळात चाेरून नेलेत. २३ जानेवारीला सकाळी ९.३० वाजता चाेरीची घटना उघडकीस अाली. ग्राम पंचायतीचे मागील दरवाजा अर्धवट उघडा असलेला ताे ढकलून चाेरट्यांनी अात प्रवेश करीत कार्यालयातील कपाटात ठेवलेल्या विविध विषयांचे रजिष्टर, दप्तर चाेरून नेले. जानेवारी महिन्यात घडलेल्या घटनेबाबत कार्यालयातील कर्मचारी यांची चाैकशी करण्यात अाली, काेणीही याबाबत माहिती दिली नसल्याने ग्राम विकास अधिकारी गाैतम वाढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. या प्रकरणाचा तपास पाेलिस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दीपक जाधव करीत अाहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !