रावेर येथील गोपाल नगरातील तिघांविरोधात यावल पोलिसात वीज चोरीचा गुन्हा


यावल : रावेर शहरात वीज वितरण कंपनीच्या वतीने वीज चोरी रोखण्यासाठी धडक मोहीम घेण्यात आली यात शहरातील गोपाल नगर भागामध्ये विज चोरी करताना तीन जणांना पकडण्यात आले त्यांना दंडाची नोटीस बजावण्यात आली मात्र त्यांनी दंड भरला नाही म्हणून या तीघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात विज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर शहरातील राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता दिलीप सुंदराणी सह वीज तंत्रज्ञ धनंजय पाटील, चेतन भारदे, वासुदेव चौधरी, कमलेश माळी या पथकाने शहरातील गोपाल नगर व स्टेशन रोड भागात वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवली यात आशिष प्रल्हाद पाटील हे वीज चोरी करतांना आढळून आले त्यांना ४७ हजार ६९८ इतका दंड आकारण्यात आला, सचिन अर्जुन माळी हे वीज चोरी करतांना मिळून आले त्यांना १४ हजार ४३२ दंड आकारण्यात आला तर नंदलाल हुकुमचंद पवार यांना २४ हजार ६५४ रुपये दंड करण्यात आला व या सर्वांना दंडाच्या नोटीस देण्यात आल्या मात्र या सर्वांनी दंड भरला नाही तेव्हा या सर्वांनी दंड भरला नाही म्हणून त्यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात सहाय्यक अभियंता दिलीप सुंदराणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !