भुसावळात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्पष्टच म्हणाले ; आमदार खडसेंसह चौधरींमध्ये गटबाजी नाही

अंतर्गत गटबाजी विसरुन पक्ष संघटना बळकट करण्याचा पदाधिकार्‍यांना सल्ला


 

State President Jayant Patil clearly said in Bhusawal; There is no factionalism among MLA Khadses and Chaudharys भुसावळ : अंतर्गत गटबाजी विसरुन पक्ष संघटना बळकट करण्यासाठी एकजूटीने काम करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केेले. सोमवारी राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल राधाकृष्ण मध्ये त्यांनी भुसावळ शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. यात बुथ कमेटी सशक्तीकरणावर अधिक भर द्यावा, असा कानमंत्रही त्यांनी पदाधिकार्‍यांना दिला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर आमदार तथा माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष नितीन धांडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांनी पक्षाचा आढावा मांडला. यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे व माजी आमदार संतोष चौेधरींनी मनोगत व्यक्त केले.

एकजुटीने काम करण्याचे आवाहन
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, आता पक्षातील अंगर्तत गटबाजी दूर करुन सर्वांनी एकजुटीने पक्ष उभारणीच्या कामाला लागावे. बुथ कमेटीचे सशक्तीकरण होणे गरजेचे आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असल्याने पदाधिकार्‍यांनी एकजूट राहून पक्षाची ताकद वाढवावी, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. यावेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, प्रा. सुनील नेवे, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, वरणगावचे सुधाकर जावळे, बाजार समितीचे माजी सभापती सचिन चौधरी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

अकलूद येथे सपकाळे कुटूंबाचे सांत्वन
अकलूद (ता. यावल) येथे 21 फेब्रुवारी रोजी शुभम सपकाळे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. 19 मार्च रोजी शुभमचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दौर्‍यात मृत शुभमच्या अकलूद येथील निवासस्थानी जावून सपकाळे कुटूंबीयांची भेट घेतली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !