धुळ्यात एक लाखांच्या किराणा मालावर चोरट्यांचा डल्ला
Thieves raid on groceries worth one lakh in Dhula धुळे : शहरालगत असलेल्या नकाणे उपनगरात मुख्य रस्त्यावरील दुकानाला चोरट्यांनी टार्गेट करीत 50 हजारांच्या रोकडसह लाखाचा किराणा माल लांबवला. नकाणे उपनगरातील मुख्य रस्त्यावर एकता प्रोव्हिजन अॅण्ड जनरल स्टोअर्स या दुकानाच्या मागील दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केल्याची घटना बुधवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली.
मध्यरात्री चोरी झाल्याचा संशय
एकता प्रोव्हिजन अॅण्ड जनरल स्टोअर्सचे मालक अशोक नामदेव पाटील हे बुधवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी गेले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ पश्चिम देवपूर पोलिसांना माहिती दिली. मंगळवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या दरवाजाचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करत ड्रॉवरमध्ये ठेवलेली जवळपास 50 हजारांची रोकड व दुकानात असलेला किराणा माल मिळून सुमारे एक लाखांचा मुद्देमाल लांबवला. विशेष म्हणजे दुकानदार अशोक पाटील हे दुकानाच्या पाठीमागील घरात राहतात शिवाय त्यांच्या घरासह शेजार्यांच्या घरांना चोरट्यांनी बाहेरून कडी लावत ही चोरी केली.