न्हावी-मारूळ रस्त्यावर एस.टी.बसने दुचाकीला उडवले : चुंचाळेतील दोघे जखमी


ST bus blew up a two-wheeler on Nahavi-Marul road : two from Chunchale were injured यावल : तालुक्यातील न्हावी ते मारूळ रस्त्यावर दुचाकीला एस.टी.बसने समोरून धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाले. या अपघातानंतर बस चालक हा जागेवरून बस सोडून पसार झाला. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एस.टी.चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघातानंतर बस चालकाने ठोकली धूम
न्हावी, ता.यावल या गावाकडून मारूळ जाणार्‍या रस्त्यावर आरीफ मोहम्मद तडवी (चुंचाळे) हे अर्षद इरफान तडवी याला घेऊन मारूळ कडून न्हावीकडे मोटरसायकल (क्रमांक एम. एच. 19 टी. 7950 ) द्वारे येत असताना न्हावी गावाकडून मारुळ गावाकडे जाणारी एस.टी. बस (क्रमांक एम. एम. 20 बी. एल. 1403) वरील चालक महारू जगन्नाथ कोळी (यावल) यांनी रस्त्याच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करून मोटरसायकलला समोरून धडक दिल्याने आरीफ तडवी व अर्षद तडवी हे जखमी झाले व मोटरसायकलचे देखील नुकसान झाले. अपघातानंतर बस सोडून चालक जागेवरून पसार झाला. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात बस चालक महारु कोळी याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेंद्र महाजन करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !