वाहनाचा जॅक चोरल्याच्या वादातून साकेगावातील डंपर चालकास मारहाण : चौघांविरोधात गुन्हा


Dumper driver beaten up in Sakegaon due to dispute over stealing vehicle jack : Crime against four भुसावळ : डंपर वाहनाचा जॅक संशयित आरोपीच्या टपरीवर सापडल्याने त्याबाबत तक्रारदाराने जाब विचारल्याने या रागातून आरोपींनी लोखंडी फायटरने हल्ला करून तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून डंपर चालकास जखमी केले. ही घटना तालुक्यातील साकेगाव येथे बुधवार, 22 रोजी रात्री 10 वाजता घडली. या प्रकरणी चौघांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
डंपर चालक दीपक सुरेश बर्‍हाटे (27, सप्तश्रृंगी मंदिराजवळ, साकेगाव) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या वाहनाचा जॅक संशयित प्रमोद तायडे याच्या टपरीवर आढळल्याने त्यास जाब विचारल्यानंतर आरोपी प्रमोदसह पंकज तायडे, रोशन अरुण कोळी, भूषण अरुण कोळी (साकेगाव, ता.भुसावळ) यांनी फायटरने तसेच चाकूसारख्या धारदार शस्त्राने हल्ला केला तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तपास निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय भोई करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !