यावलच्या तरुणाचा विषारी औषध प्राषण करून आत्महत्येचा प्रयत्न


A young man of Yaval attempted suicide by administering poisonous medicine यावल : शहरातील पंचशील नगरातील 25 वर्षीय तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच त्याला नातेवाईकांनी तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ हलवले. उपचार सुरू करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक आहे.

तरुणाची प्रकृती चिंताजनक
यावल शहरातील पंचशील नगरातील रहिवाशी सोपान रामा कोळी (25) या तरुणाने रागाच्या भरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉ.सचिन देशमुख, अधिपरीचारीका ज्योती महाजन, सुमन राऊत, बापू महाजन आदींनी त्याच्यावर उपचार सुरू केले आहे त्यांची प्रकृती सद्या चिंताजनक असून यावल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला कळू शकले नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !