भुसावळ-भादली मार्गाची सुरक्षा आयुक्तांकडून उद्या चाचणी


Bhusawal-Bhadli road will be tested tomorrow by the safety commissioner भुसावळ : भुसावळ-जळगाव या मार्गावरील चौथ्या लाईनीचे पहिल्या टप्यातील काम आटोपले असून भुसावळ-भादली या मार्गावर टाकण्यात आलेल्या चौथी लाईनीची चाचणी गुरूवार, 30 रोजीे रेल्वे सेफ्टी कमिश्नर करणार आहे. पुढच्या महिन्यात ही लाईन वाहतूकीसाठी खुली होण्याची शक्यता आहे. भुसावळ-जळगाव या मार्गावर 24 किमी अंतरात तिसरी लाईन सुरू झाली असून भुसावळ ते भादली या मार्गावर असलेली चौथी लाईनीची सुध्दा अंतीम चाचणी होणार आहे.

जळगाव-भादलीदरम्यान काम पूर्ण
भुसावळ-जळगाव या मार्गावर चौथ्या लाईनीचे काम पूर्ण झाले आहे. यातील पहिल्या टप्यातील जळगाव-भादली या मार्गावरील लाईनीचे काम पूर्ण झाले असून त्याची चाचणी झाली आहे. भुसावळ-भादली या मार्गावरील चौथी लाईनीचे काम पूर्ण झाले असल्याने ही लाईन आता वापरण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून चौथ्या लाईनीची अंतीम चाचणी घेतली जाणार आहे. नोव्हेंबर 2022 महिन्यात जळगाव-भादली या मार्गावरील चौथ्या लाइनीची चाचणी घेण्यात आली होती. ती चाचणी यशस्वी झाल्याने आता भादली ते भुसावळ या 11.5 किमी अंतरावर तासी 120 च्या वेगात गाडी चालवून चाचणी घेण्यात येणार आहे. चौथ्या रेल्वे लाईनीचे चाचणीच्या दृष्टीने बारीकसारीक कामे केली जात असून सीआरएस (मुख्य सेफ्टी कमिश्नर) हे निरीक्षण करणार आहे. सीआरएसच्या निरीक्षणानंतर त्यांचा अहवाल जीएम यांना सादर केला जाईल व त्यानंतरच साधरण: एप्रिल महिन्यात चौथी लाईनीवरून रेल्वे गाड्यांची सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. ही लाईन सुरू झाल्यावर भुसावळ-जळगाव दरम्यानची वाहतूक सुरळीत राहणार असून मालगाड्यांसाठी तिसरी व चौथी लाईनीचा वापर होणार आहे. विशेष करून सुरतकडे जाणार्‍या या लाईनीवरून धावणार असल्याने प्रवासी गाड्या आऊटरला थांबणे बंद होणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !