जळगावातील नवीन बसस्थानकातून महिलेची सव्वा लाखांची सोन्याची माळ लंपास


A woman’s gold jewelery worth half a lakh was looted from the new bus stand in Jalgaon जळगाव ः नवीन बसस्थानकातून शहरातील 54 वर्षीय महिलेची 28 ग्रॅम वजनाची व सव्वा लाख रुपये किंमतीचे सोन्याची माळ चोरट्यांनी लांबवल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
कल्पना अशोक महाजन (54, संभाजी नगर रोड, देवेंद्र नगर जळगाव) या महिला सोमवार, 27 मार्च रोजी दुपारी एक वाजता त्यांचे नातेवाईक कलावती सुरेश महाजन (रामानंदनगर) यांच्यासोबत रींगणगाव येथे नातेवाईकांकडे जाण्यासाठी जळगाव शहरातील नवीन बसस्थानक येथे आल्या. रींगणगाव येथे जाण्यासाठी त्या रवंजा बसमध्ये बसल्या असता बसमध्ये मोठी गर्दी होती. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जवळून बस जात असताना महिलेच्या गळ्यातील सव्वा लाख रुपये रुपये किंमतीची व 28 ग्रॅम सोन्याची माळ चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी वाहकाला माहिती दिल्यानंतर बस थेट पाळधी पोलिस दूरक्षेत्रात नेण्यात आली. या ठिकाणी पोलिसांनी प्रत्येक प्रवाशाची विचारपूस करून तपासणी केली असता सोन्याची माळ मिळून आली नाही. महाजन यांनी मंगळवार, 28 मार्च रोजी दुपारी तीन वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. तपास हवालदार गणेश पाटील करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !