घर घेण्यासाठी पैसे न आणल्याने जळगावातील विवाहितेचा छळ


Harassment of a married woman in Jalgaon for not bringing money to buy a house जळगाव : नवीन घर घेण्यासाठी माहेरहून पैसे न आणल्याने जळगावातील माहेर असलेल्या 29 वर्षीय विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी मंगळवारी दुपारी रामानंदनगर पोलिसात पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीसह संशयीतांविरोधात गुन्हा
शहरातील शिवकॉलनी येथे माहेर असलेल्या धनश्री योगेश जाधव (29) यांचा विवाह शिवाजी नगरातील योगेश अरुण जाधव यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती योगेश याने नवीन घर घेण्यासाठी विवाहितेकडे पैशांची मागणी केली मात्र आई-वडीलांची परीस्थिती हालाखीची असल्याने विवाहितेने पैसे आणले नाही याचा राग मनात ठेवून पती अरूण जाधव याने विवाहितेचाा शारिरीक व मानसिक छळ केला. शिवास सासू, सासरे, दिर, जेठ यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. मंगळवार, 28 मार्च रोजी विवाहितने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने पती योगेश अरुण जाधव, सासू आशा अरुण जाधव, सासरे अरुण विठ्ठल जाधव, अविनाश अरुण जाधव आणि ज्ञानेश्वर अरुण जाधव (सर्व रा. शिवाजी नगर, जळगाव) यांच्या विरोधातगुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक प्रशांत पाठक करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !