रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या : 30 रेल्वे गाड्या रद्द ; 17 गाड्यांचे मार्ग बदलले
आजपासून दोन दिवस चौथ्या रेल्वे लाईनची चाचणी : सहा गाड्या शॉर्ट टर्मिनेट
Attention Railway Passengers: 30 Trains Cancelled; Routes of 17 trains were changed भुसावळ : भुसावळ-भादली दरम्यानच्या रेल्वेच्या चौथी लाईनीची चाचणी सेप्टी कमिश्नर आज, गुरूवार, शुक्रवारी करीत असल्याने व याच काळात यार्ड रीमोल्डींगमुळे रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या ब्लॉकमुळे दोन दिवस तब्बल 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून 17 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत शिवाय सहा गाड्या या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आधीच उन्हाळ्यामुळे प्रवासी घामाघूम झाले असताना अचानक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांधून संतप्त सूर उमटत आहे. रद्द गाड्यांमध्ये भुसावळ-कटनरी, ईटारसी मेमू, देवळाळी एक्स्प्रेस, सुरत-अमरावती आदी गाड्यांचा समावेश आहे.
आजपासून दोन दिवस सुरक्षा चाचणी
भुसावळ-भादली या मार्गावरील चौथी लाईनीची चाचणी सेफ्टी कमिश्नर यांच्यातर्फे आजपासून दोन दिवस होणार आहे. एकाच ब्लॉकमध्ये तीन कामे रेल्वे प्रशासनातर्फे केली जाणार असून दोन दिवस ब्लॉक असल्याने त्याचा रेल्वे गाड्यांवर परीणाम होणार आहे. हे काम झाल्यावर भुसावळ रेल्वे यार्डातून निघणार्या मालगाड्या थेट पश्चिम रेल्वे मार्गाला जाणार आहे, यामुळे मेन लाईनीचा खोळंबा कमी होणार असून रेल्वे गाड्यांचा वेगही वाढणार आहे.
या रेल्वेगाड्या झाल्या रद्द
रद्द झालेल्या गाड्यांमध्ये 30 मार्च रोजी अमरावती-पुणे, 30 व 31 रोजीे सुटणारी सुरत-अमरावती एक्स्प्रेस, 31 मार्च व 1 एप्रिलला सुटणारी अमरावती-सुरत एक्स्प्रेस, भुसावळ-दौंड, 30 राोजी दौंड-भुसावळ एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ एक्स्प्रेस, अहमदाबाद-नागपूर प्रिमीयर एक्स्प्रेस, पुणे-नागपूर एक्स्प्रेस, मुंबई-जबलपूर एक्स्प्रेस, बडनेरा-भुसावळ मेमू, भुसावळ-इटारसी मेमू, सुरत-भुसावळ एक्स्प्रेस, भुसावळ-कटनी एक्स्प्रेस, शुक्रवार, 31 रोजी रद्द झालेल्या गाड्यांमध्ये भुसावळ-पुणे एक्स्प्रेस, भुसावळ-बडनेरा मेमू, भुसावळ-सुरत एक्स्प्रेस, देवळाली-भुसावळ एक्स्प्रेस, भुसावळ-देवळाली एक्स्प्रेस, कटनी-भुसावळ एक्स्प्रेस, नागपूर -पुणे एक्स्प्रेस, भुसावळ-नागपूर मेमू, नागपूर-भुसावळ मेमू, वर्धा-भुसावळ एक्स्प्रेस, गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस तसेच बुधवार, 29 या दिवशी जबलपूर-मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-अहमदाबाद एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
या गाड्यांचा मार्गात बदल
निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस अप डाऊन मार्गावरील ही गाडी गुरुवार, 30 मार्चला निजामुद्दीन येथून निघेल. ही गाडी रतलाम, वडोदरा, वसई रोड, पनवेलमार्गे धावणार आहे, गाडी 12715 नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस ही नांदेडहून 30 आणि 31 रोजी अकोला-भुसावळ मार्गे खंडवा मार्गे जाईल, अमृतसर सचखंड एक्स्प्रेस ही गाडी 29 व 31 या दिवशी खंडवा, भुसावळ, अकोला, पसुर मार्गे जाईल. एर्नाकुलम-निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस 12617 ही 30 रोजी एर्नाकुलमहून पनवेल-वसई रोड-वडोदरा-रतलाम-संत हिरडाराम नगर मार्गे धावेल, 12844 अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस ही गाडी अहमदाबादहून 30 रोजी सुटेल, ती रतलाम-भोपाळ इटारसी नागपूरमार्गे जाईल तसेच अहमदाबाद प्रयागराज 22967 ही गाडी 30 मार्च रोजी सुटेल ती रतलाम, भोपाळ, इटारसी मार्गे धावेल, अहमदाबाद-चेन्नई एक्स्प्रेस ही गाडी 12655 ही गाडी 30 मार्च रोजी सुटेल ती रतलाम, भोपाळ, इटारसी, खंडवा भुसावळमार्गे जाईल. 12656 चेन्नई-अहमदाबाद एक्सप्रेस ही चेन्नईहून 30 रोजी निघेल. ती भुसावळ कॉर्ड लाईन-खंडवा-इटारसी-भोपाळ-रतलाममार्गे जाईल, 19045 सुरत-छपरा एक्स्प्रेस ही 30 मार्च रोजी सुरतहून सुटेल वडोदरा-रतलाम-भोपाळ इटारसी मार्गे जाईल, 22688 ही बनारस-म्हैसूर एक्सप्रेस ही 30 मार्च रोजी बनारसहून अकोला – पसुर-अंकाई-मनमाड-अंकाई मार्गे सुटेल, 1262) यशवंतपूर-निजामुद्दीन एक्स्प्रेस ही 30 रोजी यशवंतपूरहून सुटेल ती कल्याण, वसई रोड, वडोदरा, रतलाम, संत हिरडाराम नगरमार्गे जाईल. 12534 मुंबई-लखनौ पुष्पक एक्स्प्रेस ही गाडी 31 मार्चला मुंबईहून सुटेल ती कल्याण, वसई रोड, वडोदरा, रतलाम, संत हिरडाराम नगरमार्गे जाईल. 11427 पुणे-जेएसआयडीआय एक्स्प्रेस ही शुक्रवार, 31 रोजी पुण्याहून निघेल ती लोणावळा, वसई रोड, वडोदरा, रतलाम, संत हिरडाराम नगर, बिना, कटनीमार्गे जाईल. 15029 गोरखपूर-पुणे एक्स्प्रेस ही गाडी गोरखपूरहून गुरुवार, 30 रोजी सुटेल आणि बीना-संत हिरडाराम नगर-रतलाम-वडोदरा-वसई रोड-लोणावळा मार्गे जाईल, 22687 म्हैसूर-बनारस एक्स्प्रेस 30 रोजी बनारस येथून निघेल ती वाडी, दौंड, पुणे, लोणावळा, वसई रोड, वडोदरा, रतलाम, संत हिरडाराम नगर, बिना, कटनी मार्गे प्रवास करेल, 1948 ही बरौनी-अहमदाबाद 31 मार्चला बरौनीहून निघून गेरतपूर, छायापुरी, गोदरा, रतलाम, उजैन, संत हिरडाराम नगर मार्गे जाईल.
या गाड्या शार्ट टर्मिनेट
सुरत-भुसावळ 19007 ही गाडी 29 व 30 या दिवशी पाळधी पर्यंत येईल तर 19008 ही गाडी 30 व 31 असे दोन दिवस धरणगाव येथूनच सुटेल, नंदुरबार-भुसावळ ही गाडी 30 व 31 मार्चला धरणगावपर्यंत येईल तर भुसावळ-नंदुरबार ही गाडी 30 व 31 या दिवशी पाळधी येथून सुटेल. सुरत-भुसावळ 19005 ही गाडी नरडाणापर्यंत येईल तर भुसावळ-सुरत 19006 ही गाडी नरडाणा येथून सुटेल. प्रवाशांनी बदलाची याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
