पाळधीत पालखीवर दगडफेकीनंतर संचारबंदी : 45 आरोपींना अटक
पाच दुकाने फोडली तर सहा वाहनांच्या फोडल्या काचा : पोलिस अधिकार्यासह चार कर्मचारी जखमी : शहरात तणाणपूर्व शांतता ; शंभराहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा
Curfew after stone pelting on palanquin in PaldhI : 45 accused arrested जळगाव : तालुक्यातील पाळधी गावात मंगळवारी रात्री 9.30 वाजेच्या एका धार्मिक स्थळाजवळून वणी गडावर पालखी जात असताना एका समाजातील गटाने प्रार्थनास्थळाजवळून का दिंडी आणली ? म्हणत दिंडीतील डीजे वाहनावर दगडफेक सुरू केल्याने पळापळ झाली तर डिजे वाहनाच्या काचा फुटल्या तर या प्रकारानंतर दिंडीतील लोकांनी पोलिस ठाणे गाठून घडल्या प्रकाराची माहिती यंत्रणेला दिल्यानंतर दोन गटांनी दगडफेक व काचेच्या बाटल्यांचा मारा सुरू केल्याने शहरातील दुकाने पटापट बंद झाली. दगडफेकीत कॉन्स्टेबल जितेश नाईक यांच्यासह तिघे जखमी झाले असून सहा वाहनांच्या काचा फुटल्या तर पाचहून दुकानांची तोडफोड करण्यात आल्याने लाखो रुपयांची हानी झाली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील 100 हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करीत 45 जणांना अटक केली आहे. दरम्यान, शहरातील दंगलीच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकार्यांनी 29 ते 31 दरम्यान शहरात संचारबंदी जारी केली आहे.
वाहनांच्या काचा फोडल्या
या घटनेची माहिती गावात पसरल्यानंतर काही जणांनी पाळधी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली. हे प्रकरण पोलिसांकडून हाताळले जात असतानाच, गावात दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी पोलिसांचे वाहन तसेच पंचायत समिती सदस्य मुकुंद नन्नवरे यांच्या वाहनाचीदेखील तोडफोड केली. या घटनेची माहिती जळगाव पोलिसांना मिळाल्यानंतर जळगाव, धरणगाव व चोपडा येथून पोलिसांच्या अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात आला होता.
पोलिस अधीक्षकांची धाव
घटनास्थळी पोलिस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत, ऋषिकेश रावले, एलसीबी निरीक्षक किसनराव नजन पाटील हे पथकासह पोहोचले. पोलिसांनी अतिरीक्त पालिीस बंदोबस्त आणि आरसीपी पथक तैनात केले आहे. संशयितांची धरपकड रात्रीच करण्यात आली असून गावात शांतता आहे. नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी केले आहे.
दुकानांची तोडफोड : वाहनांच्या काचा फोडल्या
जमावाने बाजारपट्टा भागातील गोधडीवाला ट्रेडर्स या अंड्याच्या दुकानाला टार्गेट करीत दुकानाचे नुकसान करीत अंडी बाहेर फेकली तसेच मोहम्मद रेहान फ्रिजवाला व अमन रेफ्रिजरेटर यांच्या दुकानातील फ्रिजचे नुकसान तर न्यू नॅशनल इलेक्ट्रीकल्समधील टीव्ही संचाचे नुकसान करण्यात आले तसेच मच्छी मार्केटचे नुकसान करण्यात आले तसेच मेन रोडवरील जनता ऑटो स्पेअर पार्ट दुकानाचे तसेच त्याच्या शेजारील पानटपरी व बुट हाऊसचेही नुकसान करण्यात आले. जमावाने सहा चारचाकी तसेच एका दुचाकीची तोडफोड केली.
यांच्याविरुद्ध दाखल झाला गुन्हा
पाळधीतील दगडफेकप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील राहुल तुकाराम पाटील, राकेश लोहार, विकी राजेंद्र बिढे, शेखर अशोक चौधरी, चेतन भरत चौधरी, योगेश अशोक चौधरी, भुपेश रवींद्र पाटील, रोहित कुमावत, मिहिर प्रल्हाद बिढे यांच्या सोबत 30 ते 40 लोक तसेच शेख दानिश शेख मुस्ताक, सलीम युनूस पिंजारी, जाफर शेख जब्बार, शेख कय्युम शेख मेहमुद मन्यार, फरजान खान अरीफ खान, शेख नदीन शेख गफ्फार, शेख नजामोद्दीन शेख उस्मोद्दीन, सुलतान खान आयुब खान, जुबेर शेख हकिम, अबजरोद्दीन शेख अमिनोद्दीन, साबीर सलीम मन्यार, आदिल जब्बार शेख, मोहिन शेख मुस्ताक, अक्रमखान आयुबखान, शेख परवेज शेख मुस्ताक, शेख अजगर शेख निसार, शाबीर युनुस पिंजारी, मुसद्दीन शेख खलील शेख, शेख तौसीफ शेख रफिक, जहागीर शेख गफ्फार, शेख शोहेब शेख रफिक, शेख शाखीर शेख गफ्फार, हर्षद शेख रफिक, रीजवान शेख सलीम, निशार शहा मस्तान शहा, अस्लम आयुब खान कुरेशी, जहागीर शहा सुपडु शहा, सुलतान शहा मस्तान शहा, शेख रिजवान शेख रशिद, 30) आवेद खान असलम खान, शेख शकिल शेक अजिज, मोहम्मद वसीम मोहम्मद कलीम, इद्रिस शेख शब्बीर, एहसान शेख सत्तार, ईसाक अहमद शब्बीर अहमद, ऐजाज अहमद शब्बीर, नासीर बशीर पिंजारी, भिकन कालु भाट, लखन गुलशन भाट, सलमान रहेमान फकिर, जावेद शहा रमजान शहा, शबीर खान महोम्मद खान, मुस्ताक शेख फकिरा, शहारुख रहेमान फकिर, आवेश मोहसीन देशमुख, जावेद उर्फ इम्रान पठाण, अफताफ शेख, भोकर्या पठाण भंगारवाला, छोटु कुरेशी, भिकन कुरेशी, युनूस शेख, आजीम रबानी देशपांडे, नयीम गणी देशपांडे, बाबा मुस्ताक देशपांडे, निसार गुलाब देशपांडे, आरीफ रफिक देशपांडे, भुर्या बारीक शेख (प्लॉट भाग), पप्पू रफिक देशपांडे, शेख सलीम शेख हुसेन, समीर देशपांडे, जाबीर पिंजारी, वसीम उर्फ बाबू शेख, जब्बार शेख (मेंम्बर) असे सर्व (रा. पाळधी ता.धरणगाव) व इतर 20 ते 30 जण नाव-गाव माहित नाही, यांच्याविरोधात भादंवि 307, 353, 332, 143, 147, 148, 149, 323, 427 तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघण आदी कलमान्वये हवालदार विजय चौधरी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे.


