जळगावात पोलिसावर हल्ला : तिघांना अटक ; एक पसार


Attack on police in Jalgaon : Three arrested ; a spread जळगाव : शहरातील हॉटेल रीगल पॅलेसमध्ये मित्रांसोबत जेवण्यासाठी आलेल्या पोलिसावर दारू पिलेल्या चौकडीने काही महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईच्या रागातून हल्ला करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

कारवाई केल्याच्या रागातून हल्ला
पोलिस गणेश पाटील हे जिल्हापेठ पोलिस ठाण्यात कार्यरत असून ते मंगळवारी रात्री त्यांचे मित्र मयूर गवळी व सीताराम पुरोहित यांच्यासोबत जेवणासाठी हॉटेल रीगलमध्ये आले असता समोरील टेबलावर बसलेले दोन जण त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने तुम्ही पोलिस गाडीत आम्हाला पोलिस ठाण्यात घेऊन गेले होते, असे त्यांनी सांगितल्यावर पाटील यांनी त्यांना ओळखले. काही वेळानंतर त्या तरुणांनी शेजारच्या टेबलावर बसलेल्या समाधान बारी व परवेज शेख यांना पाण्याची बाटली मारून फेकली व शिवीगाळ, दमदाटी केली. चौघे तरुण वाद घालत असल्याने गणेश पाटील हे त्यांना समजावत असताना त्यांनी तू कोण रे, तुझा काय संबंध आहे येथे, तू यापूर्वी मला पोलिस स्टेशनला घेऊन गेला होता. तेव्हापासून तू माझ्या डोक्यात बसला आहे. आता तू चांगलाच सापडला आहे, आता माझे मित्र सुद्धा आहेत, तू काही करू शकणार नाही, असे म्हणत वाद घालणार्‍या तरुणांपैकी एकाने खिशातून फायटर काढून पाटील यांच्या चेहर्‍यावर मारून त्यांना गंभीर दुखापत केली. तसेच त्याच्यासोबत असलेल्या तिघांनी त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून केली.

तिघांना अटक, चौघांविरुद्ध गुन्हा !
सोबत असलेल्या लोकांनी गणेश पाटील यांची मारहाण करणार्‍यांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती जिल्हापेठ पोलिसांना दिल्यानंतर लागलीच घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी संशयित कृष्णा नरेंद्र पिंगळे (20, रायसोनी नगर, जिजाऊ चौक), मयंक राजेंद्र चौधरी (27., गणेशवाडी), भावेश अनिल चौधरी (19, गणेश वाडी) यांना अटक केली तर त्यांच्यासोबत असलेला गोपाल नवल हा तेथून पसार झाला. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !