अंकलेश्वर ते बर्‍हाणपूर रस्त्याचे काम न झाल्यास आंदोलन

आरपीआय (आठवले) गटाचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला इशारा


Protest if the Ankleshwar to Berhanpur road is not completed यावल  : अंकलेश्वर-बर्‍हाणपूर रस्त्याच्या कामाला तातडीने सुरूवात न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आरपीआय आठवले गटाचे युवा जळगाव जिल्हा सचिव सुपडू संदानशिव यांनी मंगळवारी भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण कार्यालयाचे उपअभियंता दिग्विजय पाटील यांना लेखी निवेदनाद्वारे दिला.

महामार्ग रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता
निवेदनाचा आशय असा की, अंकलेश्वर-बर्‍हाणपूर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता असे समजेनासे झाले आहे त्याच बरोबर यावल-चोपडा रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. बर्‍हाणपूर महामार्गाचे तातडीने नूतनीकरण करावे तसेच यावल-चोपडा रस्त्यात डागडूजीने का असेना जीवनदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली. या रस्त्यावर अनेक अपघात झाल्याने अनेकांना नाहक प्राण गमवावे लागले आहेत. मागण्यांची दखल न घेतल्यास आर.पी.आय.आठवले गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी व युवा जळगाव जिल्हाध्यक्ष श्रीकांत वानखेडे यांच्या नेतृत्वात बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देते वेळी युवा जळगाव जिल्हा सचिव सुपडू सदानशीव व आर.पी.आय.आठवले गटाचे यावल तालुका सदस्य किरण तायडे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !