विष्णापूर-बोरमळी रस्त्यावर अवैध गांज्यासह सागवान लाकडाची वाहतूक : वनविभागाच्या कारवाईने तस्करांमध्ये घबराट
Transport of teak wood along with illegal ganja on Vishnapur-Bormali road: Panic among smugglers due to forest department’s action यावल : विष्णापूर-बोरमळी रस्त्यावर वनविभागाच्या गस्ती पथकाने अवैध सागवान लाकुड व गांज्याची वाहतूक करणारे वाहन पककडल्याने तस्करांच्या गोटात भीती पसरली आहे. कारवाईप्रसंगी वाहन चालक वाहन सोडून पसार झाला. पोलिसांनी एक लाख 84 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
संशय आल्याने कारवाई
प्रादेशिक वनविभागाचे सहायक वनसरंक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीपथकाचे वनक्षेपाल आनंदा पाटील, वनपाल रमेश थोरात, रानुदास जाधव, वनरक्षक योगेश सोनवणे, पोलिस शिपाई सचिन तडवी, वाहन चालक योगीराज तेली हे पथक चोपडा तालुक्यातील विष्णापूर ते बोरमळी रस्त्याने गस्त करीत असतांना इन्होव्हा (क्रमांक एम.एच. 43 व्ही. 5366) ही संशयास्पदरीत्या मार्गस्त होतांना दिसल्याने पथकास संशय आला. या वाहनाचा पाठलाग केला असता व चालकास वाहनास थांबविण्यास सांगितले असता अज्ञात वाहन चालक वाहन सोडून पसार झाला. या वाहनाची तपासणी केली असता त्यात अवैध साग कटसाईज 7 नग घ.मी. 0.058 अंदाजे किंमत 50 हजार रूपये तसेच 18.160 कि.ग्रा. गांजा असा मु्देमाल मिळून आला. या प्रकरणी अडावद पोलिस ठाण्यात रमेश थोरात यांच्या फिर्यादी अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. अवैध सागवान लाकूड प्रकरणी यावल वनविभागाकडे गुन्हा दाखल करण्यात आला. वनविभागाचा तपास वनपाल विष्णापूर करीत आहेतर पोलिसांचा तपास पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहे.
