जळगावातून छायाचित्रकाराची दुचाकी चोरीला
A photographer’s bike was stolen from Jalgaon जळगाव : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलासमोरून छत्तयाचित्रकाराची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकी चोरीचे सत्र कायम
दगडू मयाराम कोळी (35, वराडी, ता.चोपडा) हे छायाचित्रकार असून सोमवार 27 मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास ते दुचाकी (एम.एच.19 बी.बी.4280) ने जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाजवळ आले असता मोकळ्या जागेत त्यांनी दुचाकी पार्क केली व कामानिमित्त निघून गेले. दुपारी दोन वाजता काम आटोपून दगडू कोळी हे परत आले तेव्हा त्यांना दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आले. गुरुवारी त्यांनी जिल्हापेठ पोलिसात धाव घेवून तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार निलेश गरबड करीत आहे.
