न्हावीकरांनी जपला जातीय सलोखा : मुस्लीम बांधवांकडून मशिदीजवळ मिरवणुकीचे स्वागत

श्रीरामनवमी मिरवणुकीत मुस्लीम बांधवांकडून स्वागत


Barbers maintain communal harmony : Muslim brothers welcome the procession near the mosque भुसावळ : राज्यातील अनेक शहरांमध्ये अलीकडे समाजकंटकांकडून काही ना काही कुरापती काढून दोन समाजात तेढ निर्माण करून दंगली घडल्याच्या घटना ताज्या असतानाच यावल तालुक्यातील न्हावी ग्रामस्थांनी मात्र समाजकंटकांना चपराक बसेल, अशी कृती करीत सार्‍यांचे लक्ष वेधले आहे. न्हावीत गुरुवारी श्रीरामनवमीनिमित्त मिरवणूक निघाली व मशिदीजवळ आल्यानंतर मुस्लीम बांधवांनी हिंदू बांधवांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान केला तर हिंदू बांधवांनीही मुस्लीम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा देत एकमेकांप्रती स्नेह वाढवली. एकीकडे दोन समाजांमध्ये गैरसमजाची दूरी निर्माण करून जातीय दंगली घडवल्या जात असताना न्हावीकरांनी जपलेला जातीय सलोखा मात्र समाजकंटकांसाठी चपराक ठरत आहे.

न्हावीकरांनी जपला जातीय सलोखा
यावल तालुक्यातील न्हावी गावात प्रभू श्रीरामांच्या मंदिराजवळच मुस्लीम समाजाची मशीद आहे. गुरुवारी श्रीरामनवमीनिमित्त गावातून मिरवणूक निघाल्यानंतर सायंकाळी ती मशिदीजवळ आल्यानंतर मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीचे भव्य स्वागत केले तर हिंदू बांधवांनीदेखील मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा देत जातीय सलोखा जपला. परस्पर धर्मीयांनी एकामेका धर्माचा आदर करीत एकमेकांना शुभेच्छा देत गावात जातीय सलोख्याचे दर्शन घडवल्याने येथल्या जातीय सलोख्याचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी मसाकाचे माजी चेअरमन शरद महाजन, न्हावी सरपंच देवेंद्र चोपडे, नितीन चौधरी, सुनील फिरके, अविनाश फिरके, रवींद्र तायडे, चेतन इंगळे, नितीन इंगळे, तुकाराम कोळी, अरुण पाटील, प्रवीण वारके, सुनील कोळी, शेख गफ्फार शेख याकुब, नदीम पिंजारी, शेख जफर, शेख जब्बार, शेख नसीर वखार वाले आदींची उपस्थिती होती. गावात श्रीराम मंदिरापासून मिरवणूक निघाल्यानंतर ती मशिदीजवळ आल्यानंतर मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले व नंतर गावात फळविक्री संस्था, बस स्थानक, महादेव मंदिर स्वामीनारायण मंदिर मार्गे पुन्हा श्रीराम मंदिरात आल्यानंतर मिरवणुकीची सांगता करण्यात आली. या मिरवणुकीत फैजपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर, उपनिरीक्षक एम.जे.शेख सह कर्मचार्‍यांनी बंदोबस्त राखला.

न्हावीतील जातीय सलोखा कौतुकास्पद
न्हावी गावात जपण्यात आलेला जातीय सलोखा कौतुकास्पद असून सर्वांनी आदर्श घेण्यासारखाच असल्याची भावना फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांनी व्यक्त केली. सायंकाळी एकीकडे रामनवमीची मिरवणूक व दुसरीकडे मशिदीत नमाज सुरू झाली मात्र दोघा समाजाने त्रास होणार नसल्याची काळजी घेतली, असेही आखेगावकर म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !