पारोळा तालुक्यात खून : संशयित आरोपींची जामिनावर सुटका


Murder in Parola taluka : Suspects released on bail पारोळा : पारोळा तालुक्यात गतवर्षी दुचाकीला धक्का लागल्याच्या वादातून एकाचा मारहाणीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येवून संशयितांना अटक करण्यात आली होती. अमळनेर न्यायालयाने संशयिताचा जामीन नाकारल्यानंतर औरंगाबाद खंडपीठात दाद मागण्यात आल्यानंतर संशयितांना नुकताच जामीन मंजूर करण्यात आला.

खंडपीठात मिळाला दिलासा
19 जून 2022 रोजी पारोळा तालुक्यातील वाघोळा गावात दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी होवून या घटनेत नाना भिकारी पाटील यांचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी संशयीतांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता व संशयितांना अटक करण्यात आली होती. संशयित आरोपी रोशन पुंडलिक पाटील व सुदाम रमेश पाटील यांचा जामीन अमळनेर अतिरीक्त सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाकडे दाद मागितल्यानंतर मंगळवार, 28 रोजी खंडपीठाने संशयीतांना सशर्त जामीन मंजूर केला. संशयित आरोपींतर्फे भुसावळचे प्रसिद्ध अ‍ॅड.निर्मल दायमा, अ‍ॅड.मगरे यांनी युक्तीवाद केला. त्यांना अ‍ॅड.दंडाले व अ‍ॅड.प्रवीण पाटील यांनी सहकार्य केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !