जळगावात घरगुती गॅसचा दुकानात वापर : एकाविरोधात गुन्हा
Use of domestic gas in shops in Jalgaon : Crime against one जळगाव : घरगुती गॅसचा इंधन म्हणून दुकानावर वापर करताना जिल्हापेठ पोलिसांनी एकावर कारवाई केली. शहरातील आकाशवाणी चौकात जवळील दत्त मंदिराजवळ चहाच्या टपरीवर शुक्रवारी दुपारी दोन ही कारवाई करण्यात आली.
सिलिंडरचा अवैध वापर करणार्यांमध्ये खळबळ
शहरातील आकाशवाणी चौकजवळ असलेल्या दत्त मंदिराच्या ठिकाणी चहाची टपरीवर नितीन द्वारकादास वाणी (31, इच्छादेवी मंदिरामागे, जळगाव) हा तरुण घरगुती गॅसचा वापर चहा टपरीवर लावून व्यवसाय करत असल्याची गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईच्या सूचना पोलिसांना दिल्या. पोलिसांनी कारवाई करत गॅसची शेगडी, गॅस हंडी जप्त केली आहे. या संदर्भात पोलीस कर्मचारी विकास सुभाष पहुरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टपरीधारक नितीन द्वारकादास वाणी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड करीत आहे.
