बी.जे.मार्केटजवळ कार धडकल्याने दुचाकीस्वार जखमी


Bike rider injured in collision with car near BJ Market जळगाव : भरधाव कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. या प्रकरणी अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कार चालकाविरोधात गुन्हा
किरण भगवान सपकाळे (32, कानळदा, ता. जळगाव) हा तरुण आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. खाजगी ट्युशन घेऊन तो आपला उदरनिर्वाह करतो. 26 मार्च रोजी रात्री 10 वाजता किरण सपकाळे हा त्याची दुचाकी (एम.एच.19 डी.एम. 7674) ने नशिराबाद येथे जाण्यासाठी बी.जे. मार्केट येथून जात असताना कार क्रमांक (एम.एच.19-6451) दुचाकीला धडक दिल्याने किरण सपकाळे जखमी झाले. त्यांच्या डोक्याला हाताला पायाला गंभीर दुखापत झाली तर कार चालक हा वाहनासह पसार झाला होता. उपचार घेतल्यानंतर किरण सपकाळे यांनी शुक्रवारी दुपारी 12 वाजता जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिल्याने अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !