गुंतवणुकीतून परतावा देण्याच्या नावाखाली धुळ्यातील तरुणाला 85 हजारांचा चुना
85 thousand to a young man from Dhule धुळे : गुंतवणुकीतून मोठा परतावा देण्याच्या नावाने धुळ्यातील तरुणाला 85 हजारांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी इवा व रॉबर्ड नामक व्यक्तींवर पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
रूपेश सतीष काळे (वय 34 रा.गुलाब पुष्प बंगला, घर नं. 27, सुर्यास्तमुखी हनुमान मंदिराच्या बाजुला, शारदा नेत्रालयाजवळ, जितेंद्र नगर, देवपूर) या तरुणाच्या तक्रारीनुसार, 30 मार्च रोजी रात्री आठ वाजता इवा नामक मुलीच्या मोबाईल क्रमांकावरून आलेल्या मॅसेसनुसार ती क्रिप्टोकरंन्सीत ब्रोकर असून युवान स्पेसएक्स नावाच्या कंपनीमध्ये काम करते व ही कंपनी हाँगकाँग देशात कार्यरत आहे. कंपनीचा मायनिंग पुल हा कझाकिस्तानमध्ये असून दुसरा संशयित रॉबट याने व्हॉट्सअॅप व फेसबुकच्या माध्यमातून ते कझाकिस्तान या देशातील इक्युटी या कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासविले. त्याव्दारे गुंतवणुकीव्दारे मोठा परतावा देण्याचे आमिष दाखविले तसेच गुंतवणुकदारांनी त्रास द्यावा या उद्देशाने रूपेशच्या नावाचे बनावट प्रतिनिधी असल्याचे प्रमाणपत्र तयार करून ते व्हॉट्सअॅपवर प्रसारीत केले. त्याव्दारे त्याची 85 हजार रूपयात तसेच इतरांची फसवणूक केली.