धुळ्यातील मंगळसूत्र चोरटे अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात
Mangalsutra thieves in Dhula caught by Amalner police Mangalsutra thieves in Dhula caught by Amalner police अमळनेर : धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवणार्या दोघा मावसभावांच्या अमळनेर पोलिसांनी मुसक्या आवहल्या आहेत. संशयित पिंपळे व धुळे येथील रहिवासी आहेत.
आरोपींना अखेर अटक
शहरातील महाराणा प्रताप चौकात वंदना गणेश पाटील या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दोघांनी मोटरसायकलवर समोरच्या दिशेने येऊन लांबवले होते. या प्रकरणी पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे, मिलिंद भामरे, सूर्यकांत साळुंखे यांना सूचना केल्यानंतर दुचाकीवर असलेल्या डिजिटल मीटरच्या क्लूनंतर पोलिस पिंपळे येथील शिवाजी निंबा चौधरी (32) याच्यापर्यंत पोहोचले व त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मावस भावासोबत मंगळसूत्र लांबवल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याचा मावसभाऊ सुनील नारायण चौधरी (38, अलंकार सोसायटी, धुळे) याला अटक केली आहे. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अमळनेर शहरात महाराणा प्रताप चौक, शिवाजी बगीचासह इतर सहा ठिकाणी महिलांच्या गळ्यातून दागिने लांबवल्याची कबुली दिली.