स्पर्धेत उतरा, व्यसनापासून दूर रहा : पोलीस निरीक्षक संदीप पाटील
आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कुलचा वार्षिक पारीतोषिक वितरण कार्यक्रम
चाळीसगाव : व्यसनापासून दूर रहा, शिक्षकांनी केलेली शिक्षा ही तुमच्या आयुष्याला वळण लावणारी असते, चूक स्वीकारा, आई वडिलांचे ऐका, स्पर्धेत उतरा, प्रत्येक विद्यार्थी हा मोलाचा आहे व त्याने फक्त स्वतःला तसे सिद्ध करावे व समाजात आपल्या चांगल्या कार्याने मोठे व्हावे, असे आवाहन चाळीसगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप पाटील यांनी केले. चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित आ.बं.मुलांचे हायस्कुलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. शाळेला पोलीस स्टेशन विभागामार्फत तीन उत्कृष्ठ विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी बक्षीस देण्याचे घोषणा त्यांनी केली.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
कार्यक्रमाला सुरुवातीला दीपप्रज्वलन मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन नारायण अग्रवाल, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, अध्यक्ष आर.सी.पाटील, मुलांचे शाळेचे चेअरमन योगेश अग्रवाल, संस्थेचे सचिव डॉ.विनोद कोतकर, मुलींच्या शाळेचे चेअरमन अॅड.प्रदीप अहिरराव, समन्वय समिती चेअरमन मु.रा.अमृतकर, व्ही.एच.पटेल विद्यालयाचे चेअरमन क.मा.राजपूत, सिनिअर कॉलेज चेअरमन सुरेश स्वार, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, कलंत्री विद्यालयाचे चेअरमन भोजराज पुंशी, एच.एच.पटेल विद्यालयाचे चेअरमन अशोक बागड, बांधकाम समिती चेअरमन जितेंद्र वाणी, सराफ विद्यालयाचे चेअरमन निलेश छोरीया, क्रीडा समिती चेअरमन योगेश करंकाळ, संस्थेचे विश्वस्त हुकूमचंद बुंदेलखंडी आदींच्या उपस्थितीत दीप्रज्वलानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.

नवीन प्रयोगशाळा उभारणार
शाळेचे चेअरमन योगेश अग्रवाल यांनी शाळेसाठी नवीन गणित प्रयोगशाळा निर्माण करणार असल्याचे सांगून विद्यार्थीकेंद्रित शालेय नवनवीन विज्ञान, तंत्रज्ञानावर भर देणारी शिक्षण प्रणाली राबविणार असल्याचे सांगितले.
मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन नारायण अग्रवाल यांनी शाळेसाठी नवनवीन जे उपक्रम राबविता येतील त्यासाठी आम्ही कुठल्याही गोष्टीत मागे राहणार नसून, शाळेच्या विकासासाठी सदैव तत्पर राहणार असल्याची ग्वाही दिली. चा.ए.सोसायटीचे अध्यक्ष आर.सी.पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत सादर केले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक के.एन. तडवी, उपमुख्याध्यापक बा.बा.सोनवणे, पर्यवेक्षक मिलिंद कुलकर्णी, पर्यवेक्षिका एस.पी.पाटील, मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना इंगळे, उपमुख्याध्यापक पी.डी. येवले, शिक्षक प्रतिनिधी बापूसाहेब फणसे, माजी मुख्याध्यापक उत्तमराव काळे, शहा, शिक्षक पालक संघाचे सुनील निकम आदी उपस्थित होते. या वेळी वर्षभरातील विविध शैक्षणिक, कला, क्रीडा विभागात राज्य पातळीवर यशस्वी, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत शिक्षकांनाही सन्मानित करण्यात आले. मुख्याध्यापक तडवी यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परीचय उपमुख्याध्यापक बा.बा.सोनवणे यांनी तर सूत्रसंचालन कामिनी मुसळे, श्वेता सोमाणी, सचिन नागमोती, जयदीप गांगुर्डे यांनी केले. आभार पर्यवेक्षिका एस. पी.पाटील यांनी मानले.
