धुळ्यात खुल्या मैदानात 505 उमेदवारांनी दिली पोलिस भरती परीक्षा

भुसावळातील तृतीयपंथी ‘बेबो’ राज्यातून एकमेव उमेदवार : आता निकालाकडे नजरा


Drone cameras keep an eye on police recruitment exam in Dhule धुळे : शहरातील पोलिस कवायत मैदानावर रविवार, 2 एप्रिल रोजी पोलिस शिपाई व चालक या पदांसाठी खुल्या मैदानात लेखी परीक्षा घेण्यात आली. धुळे जिल्ह्यातील 42 पदांसाठी 505 महिला आणि पुरुष उमेदवार लेखी परीक्षेत सहभागी झाले. त्यात भुसावळ शहरातील चाँद सरवर तडवी उर्फ बेबो (27) या तृतीयपंथीय उमेदवाराने लेखी परीक्षा दिली. चाँद ही धुळ्यात पोलिस भरती परीक्षा देणारी राज्यातून एकमेव तृतीयपंथीय उमेदवार ठरली आहे. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी अत्यंत पारदर्शकपणे परीक्षा पार पडली तर परीक्षेवर 20 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर राहिल्याने धुळ्यातील आदर्श पॅटनची सर्वत्र चर्चा होत आहे.

पारदर्शकपणे पार पडली प्रक्रिया
रविवारी सकाळी सात वाजेपासून या परीक्षेला सुरुवात करण्यात आली. परीक्षेसाठी आलेल्या सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांना परीक्षेच्या ठिकाणी सोडण्यात आले. धुळ्यातील पोलिस मुख्यालयात झालेल्या पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच ही परीक्षा पारदर्शकपणे पार पडण्यासाठी पूर्ण खबरदारी घेण्यात आली. खुल्या मैदानात ही परीक्षा घेण्यात आली तर जिल्हा पोलिसांनी 20 हून अधिक कॅमेरे या परीक्षेच्या वेळी लावले होते तसेच मोठ्या प्रमाणावर पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. दरम्यान, बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षकांनी रात्रीच्या वेळेस त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टळली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !