भुसावळ कार्मिक विभागातील 15 जणांचा गौरव


भुसावळ  : भुसावळ डीआरएम कार्यालयातील कार्मिक विभागातील वरीष्ठ कार्मिक अधिकारी एन.एस. काझी यांच्यासह 15 जणांचा उत्कृष्ठ कामगिरीनिमित्त मुंबईत गौरव करण्यात आला. भुसावळ विभागाचे वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.एस.काझी यांच्यासह कार्मिक विभागातील 15 अधिकारी व कर्मचार्‍यांना मुख्य कार्मिक अधिकारीस्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती
मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी डॉ.ए.के.सिन्हा, मुख्य कार्मिक अधिकारी (सामान्य) के.के.ठाकूर आणि मुख्य कार्मिक अधिकारी हाफिज मोहम्मद यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या समारंभात भुसावळ विभागाचे वरीष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.एस.काझी, सहायक विभागीय कार्मिक अधिकारी व्ही.एस.वडनेरे, देवेंद्र विश्वकर्मा, देवेंद्र सोनार, माहेश्वरी वानखेडे, संजय अरोरा, अलका बिर्‍हाडे, योगीता बोडे, उमाकांत बाउस्कर, हुसैनी सोजर, विनोद सावळे, भैय्या बिर्‍हाडे, अंबादास सुरसे, भारत जटकर, संजय कचवे, प्रमोद तायडे यांना गौरविण्यात आले. मुंबईत गौरविण्यात आल्यावर भुसावळ येथे सत्कारमूर्ती आल्यावर डीआरएम कार्यालयात डीआरएम एस.एस. केडिया, एडीआरएम सुनील कुमार सुमन, एडीआरएम कौशेंद्रकुमार यांनीही त्यांचा गौरव केला. यावेळी विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !