धक्कादायक ! : धुळ्यात ट्रॅक्टर चालकाकडे आढळला कट्टा ; गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
गावठी कट्ट्यासह पाच जिवंत काडतूस जप्त : गुन्हेगारांमध्ये खळबळ
Shocking! : A knife found with the tractor driver in the dust ; The crime branch frowned धुळे : गावठी पिस्टलाच्या धाकावर दहशत निर्माण करणार्या ट्रॅक्टर चालक संशयीताच्या धुळे गुन्हे शाखेने मुसक्या बांधत पिस्टलासह पाच जिवंत काडतूस जप्त केले आहेत. सोमवार, 3 रोजी कारवाई करण्यात आली. या प्रकरणी भरत कैलास पावरा (धमाने चौफुली, पाण्याचा प्लांटच्या मागे, धुळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांना संशयित पावराबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. पथकाने आरोपीकडून 25 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व एक हजार रुपये किंमतीचे पाच जिवंत काडतूस जप्त करीत त्याच्याविरोधात पश्चिम देवपूर पोलिसात किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. सोमवारी पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, प्रकाश पाटील, संजय पाटील, संदीप पाटील, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, किशोर पाटील, योगेश जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केली.