रावेर शहरात वीज चोरी : तिघांविरूध्द वीज चोरीचा गुन्हा
Electricity Theft in Raver City : Crime of electricity theft against three यावल : रावेर शहरातील सौभाग्य नगर व जुना सावदा रोड या ठिकाणी राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरांविरोधात मोहिम राबवण्यात आली. तीन जण वीज चोरी करतांना आढळल्याने त्यांचना दंड भरण्यासंदर्भात नोटीस बजावल्यानंतर त्यांनी दंड न भरल्याने तिघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दंड न भरणार्या तिघांविरोधात गुन्हा
रावेर येथील वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता दिलीप सुंदराणी यांनी शहरात सौभाग्य नगर व जुना सावदा रोड येथे वीज चोरी विरुद्ध धडक मोहिम राबवली. आपल्यासोबत वीज तंत्रज्ञ भिका साळुंखे, अमोल हिवरे, वासुदेव चौधरी, कमलेश माळी यांना घेऊन त्यांनी या भागात तपासणी केली असता त्यांना चंद्रकांत लक्ष्मण पाटील यांच्या घरात वीज मीटरमध्ये फेरफार केलेली आढळली. वीज चोरी केल्यानंतर त्यांना 57 हजार 838 रुपये इतका दंड करण्यात आला. त्याचप्रमाणे सुनील जगदीश गाढे यांच्या नावे असलेल्या मीटरमध्ये सोनाली सुनील गाढे यांनी फेरफार केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना 15 हजार 765 रुपये दंड करण्यात आला आणि शांताराम उखर्डू महाजन यांच्या नावे असलेल्या मीटरमध्ये बेबाबाई शांताराम महाजन यांनी फेरफार केल्याने त्यांना 26 हजार 413 रुपये दंड आकारून नोटीस देण्यात आली मात्र या तिघांनी वीज चोरी प्रकरणी दंड भरला नसल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
