अमळनेरातून 56 लाखांचा संतूर साबण लांबवला : जयपूरातील दोघे जाळ्यात


Santoor soap worth 56 lakhs stolen from Amalnera: Two from Jaipur in the net Santoor soap worth 56 lakhs stolen from Amalnera: Two from Jaipur in the net अमळनेर : अमळनेर शहरातील 56 लाखांचा साबण चोरी प्रकरणी नरेंद्रकुमार हरिप्रसाद स्वामी (31) आणि हारुन रशीद साजिदखान (38, दोघे रा.जयपूर) यांना अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी जोधपूर येथे विकलेल्या 18 लाख रुपयांच्या 325 साबण पेट्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दरम्यान, संशयीताना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

प्रेयसीला कॉक केला अन अडकला
राजस्थानमधील सुनील ओमप्रकाश भार्गव याने आपले नाव कैलास गुजर सांगून अमळनेर येथील कंपनीतून साबणाच्या 56 लाख रुपये किंमतीच्या पेट्या असलेला ट्रक भरला. त्यानंतर तो माल घेऊन गायब झाला. या गुन्ह्यातील मास्टर माइंड नरेंद्र स्वामी असल्याने त्याने त्याच क्रमांकाचा ट्रक रावेर व इतर दोन ठिकाणांहून रवाना केल्याने पोलिसही संभ्रमात पडले होते मात्र ज्या क्रमांकावरून चालक सुनील आधी बोलला त्याचे लोकेशन दुसरीकडेच येत होते त्यामुळे एकाच क्रमांकाच्या वेगवेगळ्या गाड्या असल्याचा संशय आला. त्यानंतर कॉन्स्टेबल निलेश मोरे यांनी सीडीआर लोकेशनवरून स्वामीने 20 सेकंद आपल्या प्रेयसीला कॉल केल्याचे शोधून काढले आणि मार्ग सापडला. प्रेयसीचा दुसरा संपर्क नंबर हुडकून काढण्यात आला परंतु तिने पोलिसाचा नंबर ब्लॉक केला. प्रेयसीचा बिकानेर येथील पत्ता शोधून माहिती काढण्यात आल्यानंतर सुनील भार्गव याने कैलास गुजर हे नाव बदलले असल्याचे लक्षात आले. तो अनिल भार्गव आणि नरेंद्र स्वामी यांच्यासोबत मोठ्या चोर्‍या करत असल्याचे पोलिसांना कळाले. आरोपी स्वामी हा हैद्राबाद ते जयपूर रेल्वेने येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने रेल्वेतून प्रवास सुरू करीत भिलवाडा स्टेशनवर आरोपी स्वामीवर झडप घातली. स्वामीने हारुन रशीद साजिदखान हा देखील गुन्ह्यात सहभागी असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. हे दोघं जण बनावट ट्रक क्रमांक, बनावट चेसीस नंबर, बदलले आठ सीमकार्ड, पाच मोबाईल, बनावट फास्ट टॅग, बनावट ओळखपत्र वापरून गुन्हे करत होते. पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल भुसारे, भैयासाहेब देशमुख, हेकॉ. सुनील हटकर, कॉ. नीलेश मोरे, मिलिंद भामरे, उज्ज्वल पाटील यांच्या पथकासह शरद पाटील, श्रीराम पाटील, अमोल पाटील यांनी सहकार्य केले.





अन्य चौघे रडारवर
अटकेतील दोघा आरोपींना अमळनेर न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून या गुन्ह्यातील अटकेतील आरोपींची संख्या तीन झाली आहे तर अन्य चार संशयीतांच्या शोधासाठी पथक रवाना झाल्याची माहिती निरीक्षक विजय शिंदे यांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !