भुसावळातील तरुणीचा विनयभंग : जामनेरच्या तरुणाविरोधात गुन्हा


molestation of young woman in Bhusawal : Crime against young man of Jamner भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील 23 वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तसेच सोशल मिडीयावर स्टेटस ठेवून विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार 24 फेब्रुवारी ते 3 मार्चदरम्यान शहरात घडला. या प्रकरणी पीडीत तरुणीच्या फिर्यादीवरून संशयित विजय पांडुरंग वंजारी (कस्तुरी नगर, जामनेर पुरा, जामनेर) याच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

जामनेरच्या तरुणाविरोधात गुन्हा
पीडीतेच्या तक्रारीनुसार, संशयिताने 3 रोजी त्याच्या व्हॉटसअ‍ॅपवर तसेच फेसबुकवर तरुणीचे फोटो स्टेटस ठेवून तिला प्रिये, डिअर, बायको असे संबोधून तसेच पाठलाग करीत तरुणीचा विनयभंग केला. तपास नाईक भूषण जैतकर करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !