भुसावळात तलवार बाळगली : कुविख्यात शेख चाँदला अटक


Carrying a sword in Bhusawal : Notorious Sheikh Chand arrested भुसावळ : शहरातील दीनदयाल नगर भागातील संशयित तथा पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार शेख चाँद शेख हमीद (35) याच्या घरात तलवार असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी रात्री 10.30 वाजता कारवाई करीत तलवार जप्त केली तसेच संशयीताला अटक करण्यात आली.

बाजारपेठ पोलिसात गुन्हा
या प्रकरणी प्रशांत नीळकंठ सोनार यांच्या फिर्यादीनुसार, संशयित शेख चाँद शेख हमीद (35) विरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जितेंद्र पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !