घरात धूळ उडाल्याने निंभोर्‍यात कुटुंबास मारहाण : तिघांविरोधात गुन्हा


Family assaulted in Nimbhoria due to dust blowing in the house : Crime against three निंभोरा  : घर बांधकाम सुरू असताना धूळ घरात उडाल्याच्या कारणावरून दाम्पत्यासह त्यांच्या मुलांना मारहाण करून शिविगाळ करण्यात आल्याची घटना निंभोरा, ता.रावेर येथे मंगळवारी दुपारी चार वाजता घडली. या प्रकरणी तिघांविरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
अनिता विश्वनाथ धनके (48) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या घराचे काम सुरू असून धूळ संशयिताच्या घरात उडाल्याच्या कारणावरून त्यांनी फिर्यादीसह दोन्ही मुलांसह पतीला शिविगाळ करीत मारहाण केली तसेच स्वतःसह मुलगा शुभमला डोक्यात वीट मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी मुरलीधर बळीराम सोनवणे, राजू मुरलीधर सोनवणे, प्रशांत मुरलीधर सोनवणे (सर्व रा.निंभोरा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक राजेंद्र पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !