रावेर तालुका खुनाने हादरला : 32 वर्षीय इसमाचा निर्घूण खून


Raver taluka rocked by murder: Brutal murder of 32-year-old Isma भुसावळ : रावेर तालुक्यातील निमड्या गावातील 32 वर्षीय इसमाचा गावापासून एक किलोमीटर अंतरावर खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर रावेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. संजय बारेला (32, निमड्या, ता.रावेर) असे खून झालेल्याचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. बारेला यांचा खून कुणी व का केली? याची माहिती अद्याप निष्पन्न झालेली नाही.

खून करून मृतदेह फेकला
निमड्या गावापासून जवळच संजय बारेला यांचा खून झालेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना शनिवारी सकाळी आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, रावेरचे पोलिस निरीक्षक कैलास नगरे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांनी धाव घेतली. घटनास्थळी डॉग स्कॉड व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. मयताच्या खुनाचे कारण अस्पष्ट असून पोलिसांकडून तपासाला वेग देण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !