गृह विभागाचा अजब कारभार : राज्यातील 162 पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीला मुहूर्त मिळेना !


The strange work of the Home Department : The promotion of 162 police inspectors in the state did not get time!

मुंबई : राज्यातील 162 पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीचा आदेश निघालेला नसतानाच काही पात्र अधिकारी आता सेवानिवृत्तदेखील झाल्याची माहिती समोर आली आहे. गृह विभागाच्या अजब कारभाराने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

बदल्यांची प्रक्रिया अतिशय संथ गतीने
राज्याचे गृहखाते पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या आणि पदोन्नती, यामुळे नेहमीच चर्चेत असते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांवरून रणकंदन झाले होते. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांबाबत सावध भूमिका घेताना दिसत आहे. पोलीस शिपायापासून ते वरीष्ठ अधिकार्‍यांपर्यंतच्या बदल्यांच्या फायलींची अलिकडे गती मंदावली आहे. सरकारच्या या भूमिकेचा फटका राज्यातील 162 पोलिस निरीक्षकांना बसला आहे. पोलिस निरीक्षकांना उपअधीक्षक पदी पदोन्नती देण्याची प्रक्रिया ऑगस्ट 2022 मध्ये सुरू झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये पदोन्नीतीची यादी अंतिम केली गेली. ही यादी पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहोचलीदेखील. त्यांनी ही पदोन्नती गृहीत धरून जबाबदार्‍यांचे वाटप केले. हे वाटप करताना पदोन्नती मिळालेल्या पोलिस निरीक्षकांना वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षकांची पदोन्नती रखडली
पोलिस निरीक्षकांच्या उपअधीक्षकपदी पदोन्नती दिल्यानंतर पोलिस निरिक्षकांच्या जागा रीक्त होवून त्या जागेवर सहाय्यक पोलिस निरीक्षकांना पदोन्नती मिळेल मात्र निरीक्षकांचे आदेश निघत नसल्याने सहाय्यक निरीक्षकही पदोन्नतीपासून वंचित ठरत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !