बामणोदमधील वीज चोरी करणार्या तिघांविरोधात गुन्हा
Case against three who stole electricity in Bamanod यावल : तालुक्यातील बामणोद येथे राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पथकाने वी चोरट्यांविरुद्ध धडक मोहिम राबवली. यामध्ये गावात विविध भागात वीज चोरी करतांना तीन जण आढळल्याने त्यांना दंड भरण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आल्या मात्र त्यांनी दंड न भरल्याने तिघांविरुद्ध यावल पोलिसात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
वीज चोरी प्रकरणी अखेर गुन्हा
बामणोद येथील सहाय्यक अभियंता देवेंद्र भंगाळे यांनी बामणोद गावात वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवली. यामध्ये गावात विजय अरुण सोनवणे, गोकुळ दामु सोनवणे व जगन ताराचंद सोनवणे हे तिघे वीज चोरी करतांना आढळल्याने त्यांना प्रत्येकी दंड आकारण्यात आला व दंड भरण्याच्या नोटीसी बजावण्यात आल्या मात्र या तिघांनी दंड भरला नाही. या तिघांनी दंड न भरल्यामुळे त्यांच्याविरुद्ध यावल पोलिसात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
