खिर्डी येथे मृत अवस्थेत आढळले हरीण
खिर्डी : या परीसरात रविवारी पहाटेच्या सुमारास नर जातीचे हरीण (चितळ) मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. हरणाचा मृत्यू नेमका कसा झाला? याबाबत अस्पष्टता आहे.
वनविभागाकडून पंचनामा
खिर्डी बुद्रुक गावातील ऐनपूर रोडवर मृत अवस्थेत हरीण आढळले असून हरणाची शिकार झाली की त्याचा अन्य कारणाने मृत्यू झाला ? याची माहिती कळू शकली नाही. रात्री किंवा पहाटेच्या सुमारास हा चितळ रहदारी भागात आल्याने कुत्र्यांनी त्याला चावा घेतल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट झाल्याचे वन्यजीवचे कापसे यांनी सांगितले. मयत हरणाची शेपूटही गायब झाली असून याबाबची माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला दिल्यानंतर तत्काळ वनविभागातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. लोहारा बीटचे वनरक्षक युवराज मराठे यांनी पंचनामा केला. पाल येथील वनपाल डी.जे.रायसिंग, रावेर वनपाल रवी सोनावणे, वनपाल राजेंद्र सलदार, निंभोरा पोलिस स्टेशनचे सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, उपनिरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास रावेर परीक्षेत्र अधिकारी अजय बावने करीत आहे.
