ओबीसी आरक्षणाची सुनावणी लांबली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पावसाळ्यानंतरच !
Hearing of OBC reservation postponed: Elections of local bodies now only after monsoon!
मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महिन्यात होणार !

मुंबई : ओबीसी आरक्षणावरील सुनावणी लांबत चालल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकादेखील लांबत आहेत. महाराष्ट्रातील 92 नगर परीषदांमध्ये ओबीसी आरक्षण मिळावे आणि मविआ सरकारच्या काळात वॉर्ड रचनेमध्ये झालेले बदल रद्द करावेत या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी तीन आठवड्यांनंतर होणार असून राज्यात पावसाळ्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात या निवडणुका होतील, अशी शक्यता आहे.
सोमवारच्या सुनावणीत काय घडले ?
राज्यातील 92 नगर परीषदांमध्ये ओबीसी आरक्षण मिळावे आणि मविआ सरकारच्या काळात वॉर्ड रचनेमध्ये झालेले बदल रद्द करावेत यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी तीन आठवड्यांनंतर होणार आहे. परिणामी, या निवडणुका पावसाळ्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालय यासंदर्भात सोमवारी सुनावणी पार पडली मात्र राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्यासंदर्भात अंतिम आदेश न्यायालयाने दिला नाही. तीन आठवड्यांनी यावर सुनावणी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
आठ महिन्यांपासून सुनावणी रखडली
राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर ही सुनावणी आठ महिन्यांपासून रखडलेली आहे. विद्यमान राज्य सरकारला म्हणजे भाजप-शिवसेना युतीला या निवडणुका शक्य तितक्या लांबवायच्या आहेत.त्यामुळे आता पावसाळ्यापूर्वी या निवडणुका होणं अशक्य असल्याचं बोललं जात आहे.
