भुसावळातील गांधी नगरात 35 वर्षीय तरुणाची आत्महत्या
भुसावळ : शहरातील गांधी नगरात 35 वर्षीय तरुणाने घरी कुणी नसताना गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी साडेसहा वाजेच्या पूर्वी घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गणेश शिवण्णा पुलिबंटू (35, घर क्रमांक 146, गांधी नगर, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी शिवन्ना पुलिबंटू यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक भूषण जैतकर करीत आहेत.
