भुसावळातील शांती नगरात रेल्वेतील महिला कर्मचार्‍याचे घर फोडले : 44 हजारांचा ऐवज चोरीला


The house of a female railway employee was broken into in Shanti Nagar in Bhusawal : Rs 44,000 was stolen भुसावळ : शहरात काही दिवसांच्या अंतराने पुन्हा चोर्‍या-घरफोड्या सुरू झाल्याने नागरीकांमध्ये भीती पसरली आहे. शहरातील वर्दळीच्या शांती नगरातील उमय रेसीडेन्सीमधील दुसर्‍या मजल्यावर बंद प्लॅटमधून चोरट्यांनी 44 हजारांचा ऐवज लांबवल्याने रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे. शांती नगरातील उमय रेसीडेन्सीमधील दुसर्‍या मजल्यावरनिलम प्रकाश धाडसे (39, शांती नगर, भुसावळ) या आई व मुलीसह वास्तव्यास असून भुसावळ डीआरएम कार्यालयातील रेल्वेच्या अकाउंट विभागात त्या कार्यरत आहेत.

भर दिवसा घरफोडीचा संशय
मुंबईतस्थित भावाकडे धाडसे परीवार मंगळवार, 4 रोजी गेल्यानंतर प्लॅटला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. रविवारी सायंकाळ प्लॅटमधील रहिवाशांना प्लॅटचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी खातरजमा केल्यानंतर घरफोडी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब धाडसे यांना कळवली त्यावेळी धाडसे या रेल्वेद्वारे भुसावळकडे निघाल्या होत्या. रविवारी रात्री उशिरा धाडसे या प्लॅटमध्ये आल्यानंतर त्यांनी पाहणी केली मात्र घरातील ऐवजाबाबत आईला अधिक माहिती असल्याने मंगळवारी त्यांच्या आई आल्यानंतर परीवाराने खातरजमा केल्यानंतर शहर पोलिसात तक्रार दिल्यानंतर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांनी कपाटातील 12 ग्रॅम वजनाची व 40 हजार 60 रुपये किंमतीची सोन्याची चैन, दोन हजार रुपये किंमतीची चांदीची पायल तसेच दोन हजार रुपये किंमतीच्या सहा बांगड्या असा 44 हजार 60 रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबवल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलीस निरीक्षक गजानन पडघण व सहकार्‍यांनी प्लॅटची पाहणी करीत पंचनामा केला. तपास सहाय्यक फौजदार सैय्यद ईकबाल अली इब्राहीम अली करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !