आईच्या अस्थी व रक्षाचे विसर्जन टाळत वृक्षारोपण


भुसावळ : अंत्यसंस्कारानंतर अस्थी राखेचे नदी किंवा तलावात विसर्जन केल्यास जलप्रदूषण होत असल्याने अस्थी, राख जमिनीत पुरून त्यावर आईच्या स्मृतीनिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम भुसावळ येथील प्रा.डॉ.सुनील नेवे व नेवे परीवाराने राबवला. त्यासाठी भुसावळातील पर्यावरण जागर प्रतिष्ठानने संकल्पना मांडली. प्रा.डॉ.नेवे यांच्या मातोश्री प्रेमलता मधुकर नेवे यांचे नुकतेच निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कार पर्यावरणपूरक व पद्धतीने करण्यात आले.

वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धन
आईच्या रक्षा व अस्थीचे विसर्जन नदीत न करता खड्डे खोदून त्यात अस्थी व रक्षा टाकण्यात आली. यानंतर नेवे कुटुंबीयांनी वृक्ष लागवड केली. पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नाना पाटील, सुरेंद्रसिंग पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला. वृक्षानिमित्त आईच्या स्मृती कायम राहतील आणि वृक्षांचे संवर्धनही होईल, असा दुहेरी हेतू साध्य होईल, असे प्रा.सुनील नेवे म्हणाले.

वृक्ष संवर्धनाची घेतली जवाबदारी
भुसावळ येथे स्मृती वृक्ष लावताना नेवे परीवारासोबत भुसावळ येथील पर्यावरण जागरचे नाना पाटील, सुरेंद्रसिंग चौधरी प्रशांत पाटील त्याचबरोबर नेवे परीवारातील सदस्य उपस्थित हेते. प्रा.डॉ.सुनील नेवे यांना यावेळी आईच्या स्मृतींनी गहिवरून आले. त्यांनी वृक्ष संवर्धनाची जबाबदारीही घेतली आहे. अस्थी व रक्षा विसर्जनातून स्मृतींचे वृक्ष लावा व आपल्या पूर्वजांच्या आठवणी कायम ठेवा, हा उपक्रम राबवण्यामागे जल प्रदूषण थांबावे हा उद्देश असल्याचे नाना पाटील म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !