यावल पोलीस ठाण्याच्या आवारात झोंबाझोंबी : चौघांविरोधात गुन्हा
यावल : यावल पोलीस ठाण्याच्या आवारात चार जणांनी आपसातच झुंबाझोंबी करून वाद घातला व सार्वजनिक शांततेचा भंग केल्याने त्यांच्याविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
यावल पोलीस ठाण्याच्या आवारात विशाल ज्ञानेश्वर पाटील, चावदस तुकाराम पाटील, सतीश चावदस पाटील व ज्ञानेश्वर नथु पाटील (सर्व राहणार सावखेडासीम) ता. यावल यांनी आपसात वादविवाद केला व झोंबाझोंबी करीत आपसात वाद घातल्याने सार्वजनिक शांततेचा भंग झाला. पोलीस शिपाई अनिल रमेश साळुंखे यांच्या फिर्यादीवरून चार जणाविरुद्ध सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय देवरे करीत आहे.
