पुण्यातील डीआरडीओचा शास्त्रज्ञ हनी ट्रॅपमध्ये अडकला : एटीएसने केली अटक


DRDO scientist in Pune caught in honey trap : ATS arrested पुणे : पाकिस्तानी महिलेच्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या डीआरडीओच्या संचालकांनी भारतातील गोपनीय माहिती पुरवल्याच्या संशयातून त्यास महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. प्रदीप कुरुलकर (60) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. कुरुलकर हे संरक्षण संशोधन व विकास (डीआरडीओ) या भारतीय लष्कराच्या संस्थेत संशोधन व विकास (अभियांत्रिकी) या विभागाचे संचालक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.

हनी ट्रॅपमध्ये अडकला शास्त्रज्ञ
शास्त्रज्ञाने हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा संशय केला जात आहे. कुरूलकरला पाकिस्तानी गुप्तचर संस्था (आयएसआय) ने हनीट्रॅपमध्ये पाकिस्तानी तरुणीच्या माध्यमातून अडकवले. व्हॉटसअपवर मेसेज, व्हिडिओद्वारे भारतीय लष्कराशी संशोधनाची गोपनीय माहिती संशयिताने पुरवल्याचा आरोप आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा संशय अधिकार्‍यांनी व्यक्त होत असून संबंधित अधिकार्‍याच्या निवृत्तीला सहा महिने राहिले असताना त्याच्यावर आधी हनी ट्रॅप व नंतर अटकेची कारवाई झाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !