नशिराबाद शिवारात आढळली मानवी कवटी व हाडे ; काय घडले नेमकी जाणून घ्या बातमी


Human skull and bones found in Nashirabad Shiwar ; Find out exactly what happened

जळगाव : नशिराबाद शेत शिवारातील शेतात मानवी कवटी व हाडे आढळल्याचा प्रकार सुमारे चार महिन्यांपूर्वी घडला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपासाला गती देत आधी मयताची ओखळ पटवण्यावर भर दिल्यानंतर मयताजवळील आधारकार्ड व मोबाईलद्वारे त्याची ओळख पटवली. मयत हा रामा उराव (वय-52, रा.मोकार्या, जि.लोहरदगा, राज्य झारखंड) असून त्याचा मद्य सेवनाने मृत्यू झाल्याचा संशय आहे. शुक्रवारी या प्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.





ओळख पटली मात्र घातपात नाही
नशिराबाद शिवारातील शेतात नारायण पाथरवट हे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांच्या शेताजवळ मानवी कवटी व हाडे आढळल्यानंतर त्यांनी तातडीने नशिराबाद पोलिसांना माहिती कळवल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली. यावेळी मानवी कवटीच्या बाजूला आधारकार्ड, सॅमसंग मोबाईल अशा वस्तू आढळल्यानंतर मयताची ओळख पटली मात्र मयताचा अती सेवनाने मृत्यू झाल्याचा अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तवला असून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !