जळगावात महिलेने दारूसाठी पैसे न दिल्याने आरोपीने डोक्यात वीट टाकली


In Jalgaon, the accused pelted a woman with a brick after she did not pay for liquor जळगाव : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने आरोपीने महिलेला वीट मारून फफेकल्याची घटना जळगाव शहरातील धनाजी काळे नगरात रविवारी घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयिताविरोधात गुन्हा दाखल
सोनाली दिनेश आकुले ही महिला आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. रविवार, 7 मे रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास महिला घरी असतांना त्याच भागात राहणारा गणेश सानप आला व त्याने महिलेकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले परंतु महिलेने पैसे दिले नाही म्हणून गणेश सानप याने महिलेला शिवीगाळ करून हातातील वीट महिलेच्या डोक्यावर फेकून मारली. याप्रकरणी महिलेने सायंकाळी सात वाजता शहर पाोलिसात तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी गणेश सानप याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संजय झाल्टे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !