जळगावात वयोवृद्धेला बोतण्यात गुंतवत सोन्याची पोत लांबवली
In Jalgaon, the old man was engaged in sowing, and the gold texture was extended जळगाव : सोन्याची पोत डबल करण्याच्या आमिषाने महिलेला जळगावात गंडा घालण्यात आला. ही घटना सोमवार, 8 मे रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
वृद्धेचा विश्वास मिळवून हातचलाखीने लांबवली पोत
वत्सला सुभाष चौधरी (68, रा. गुरुदत्त कॉलनी, स्वामी समर्थ केंद्राजवळ, गणेश कॉलनी) या सोमवारी दुपारी 12 वाजता हॉस्पिटलमध्ये औषधी घेण्यासाठी रीक्षाने गेल्या असता गणेश कॉलनीतील गुंजन खरेदी विक्री केंद्रच्या जवळ त्या रीक्षातून उतरल्या. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याकडे आले त्यांनी सांगितले की, तुमचा डबलचा फायदा करून देतो, तुमच्या गळ्यातील पोत मला काढून द्या, असे सांगितल्यावर वृद्ध महिलेने गळ्यातील सोन्याची पोत काढून दिली. दोघांपैकी एकाने पोत हातात घेऊन कागदात गुंडाळून दोरा बांधून वृद्ध महिलेच्या पिशवीत ठेवली व सांगितले की, तुम्ही आता घरी जा, घरी गेल्यावर ही पुडी उघडा. त्यानुसार वृद्ध महिला घरी गेल्या. पुडी उघडून बघितले तर सोन्याची पोत नव्हती.
दोघा भामट्यांविरोधात गुन्हा
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुलगा अशोक सुभाष चौधरी यांना सोबत घेवून वृध्द महिला जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले. वृद्ध महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सायंकाळी अज्ञात दोन जणांवर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


