राज्यातील सत्तासंघर्षाचा उद्या निकाल ?
The result of the power struggle in the state tomorrow? मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाबाबत 11 ते 13 मे दरम्यान निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. गुरुवारी सत्तासंघर्षाचा निकाल समोर येण्याची शक्यता आहे. रन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी एका सुनावणीदरम्यान यावर टिपण्णी केली. घटनापीठाकडून गुरुवारी दोन महत्त्वाचे निकाल लागण्याची शक्यता आहे. घटनापीठातील एक न्यायमूर्ती सोमवार. 15 मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे लवकरच राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लागू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिंदे गटाने व्यक्त केला विश्वास
काही कायदेतज्ज्ञ 16 आमदार अपात्र ठरून शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा केला जात आहे तर काही कायद्याचे जाणकार आमदार अपात्र झाले तरी सरकारला धोका नाही, असा दावा करीत आहेत मात्र यातच शिंदे गटाकडून या प्रकरणी प्रतिक्रिया आली आहे. आम्ही काही चुकीचे केलेले नाही, निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल, असा विश्वास शिंदे गटाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

निकालाची धास्ती ठाकरे गटाला अधिक
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. आधी निकाल येऊ द्या मगच सर्वांनी आपले ज्ञान पाजळावं. सर्व जण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश असल्यासारखे प्रतिक्रिया देत आहेत. निकाल हा आमच्या बाजूनंच लागेल. कारण आम्ही काही चुकीचं केलेलं नाही. आता धास्ती कोणाला आहे तर ठाकरे गटाच्या आमदारांना आहे. कारण आम्ही पात्र झालो तर ते अपात्र होतील, असं शिरसाट यांनी म्हटलं.
