जळगावातील जाहीर सभेत आक्षेपार्ह विधान : प्रशांत जुवेकरांसह दोघांविरोधात गुन्हा
Offensive statements in a public meeting in Jalgaon : Crime against two including Prashant Juvekar जळगाव : हिंदू जनजागृती समितीच्या झालेल्या जाहीर सभेत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात प्रशांत जुवेकर यांच्यासह दोघांविरोधात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव शहरातील जी.एस. मैदानावर 25 डिसेंबर रोजी झालेल्या सभेप्रकरणी तब्बल चार महिन्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला हे विशेष !
तेढ निर्माण करणारे वक्तव्य भोवले
हिंदू जनजागृती समितीच्या वतीने 25 डिसेंबर 2022 रोजी जळगाव शहरातील जी.एस. मैदानात जाहीर सभा झाली होती. या सभेत प्रशांत जुवेकर (जळगाव) आणि सुरेश चव्हाणके (दिल्ली) यांनी दोन समाजात तेढ निर्माण होतील, असे आक्षेपार्ह विधान व भाषण केल्याचा आरोप आहे तसेच पोलिसांनी सभेसाठी दिलेल्या अटी शर्तीचे उल्लंघण केल्याने चार महिन्यानंतर 9 मे रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक भरत चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात प्रशांत जुवेकर आणि सुरेश चव्हाणके या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.


