चाळीसगावात डीजे बंद केल्याच्या वादातून पोलिसाला मारहाण
A policeman was beaten up due to a dispute over the closure of a DJ in Chalisgaon चाळीसगाव : हळद समारंभात मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याने सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग होत असल्याने हा स्पीकर बंद करण्यास सांगण्यास गेलेल्या पोलिसांनाच धक्काबुक्की करीत मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आल्याची संतापजनक घटना बुधवार, 10 मे रोजी सव्वाबारा वाजेच्या सुमारास भडगाव रोडवरील अभिनव शाळेसमोर घडली. या प्रकरणी तिघांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित पसार झाले असून त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.
पोलिसांवरच उचलला हात
भडगाव रोड परीसरातील लोखंडवाडा कॉम्प्लेक्ससमोरील अभिनव शाळेसमोर हळद समारंभात डीजे स्पीकरच्या आवाजात गाणी लावून काही जण नाचत असता पोलीस निरीक्षकांनी स्पीकरचा आवाज बंद करण्यास पोलिसांना सांगितल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल विजय महाजन, नरेंद्र चौधरी यांनी धाव घेवून संबंधितांना स्पीकर बंद करण्याबाबत सुचित केले असता संशयित शाम गवळी याने हुज्जत घातली तसेच स्पीकर बंद करू देणार नाही म्हणत विजय महाजन यांची कॉलर पकडून शिविगाळ केली तसेच त्यांच्यासह 35 ते 40 वर्षीय अनोळखी संशयित व एम.एच.04 डी.के.6697 वरील अनोळखी चालक मारहाण केली. .याप्रकरणी गवळी यांच्यासह अन्य दोघा अनोळखींविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात चालक व कॉन्स्टेबल विजय अभिमन महाजन यांच्या फिर्यादीनुसार गुरनं.203/2023, भादंवि कलम 353, 332, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक सचिन कापडणीस करीत आहेत.


