लष्करात नोकरीचे आमिषाने पाचोर्यातील तरुणाला 15 लाखांचा गंडा
पाचोरा : लष्करात नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन येथील तरुणाकडून 15 लाख 16 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अखेर पोलिसात गुन्हा
पाचोरा येथील शेती करणार्या व तलाठी कॉलनीतील प्रवीण हरी शिंदे यांच्याकडून आरोपी रामकृष्ण शंकर राऊत याने लष्करात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून प्रवीण शिंदे आणि त्यांच्या भावाने 20 ऑगस्ट 2019 ते 14 सप्टेंबर 2020 दरम्यान 15 लाख 16 हजार रुपये बँक खात्याद्वारे स्वीकारले. पैसे देवूनही नोकरी न लागल्याने व आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवीण शिंदे यांनी याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहेत.


